‘ऑपरेशन सिंदूर’ विरोधात पोस्ट; प्राध्यापकाला अटक   

चंडीगढ : ऑपरेशन सिंदूर विरोधात समाजमाध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍या अशोका विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक अली खान महमूदाबाद याला रविवारी पोलिसांनी अटक केली. भाजप युवा मोर्चाच्या नेत्याने केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. 
 
कर्नल सोफीया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्या पत्रकार परिषदेचे वर्णन त्यांनी एक दृष्टीक्षेप असे केले. पण दृश्यचित्रांना प्रत्यक्षात आणले पाहिजे, अन्यथा ते केवळ ढोंग आहे, असा अली खान महमूदाबाद म्हणाला होता. या प्रकरणी हरयाना राज्य महिला आयोगाने त्याला नोटीस पाठवली होती. त्यानंतर रविवारी त्याला दिल्लीत अटक करण्यात आली या प्राध्यापकाने त्यांच्यासाठी ज्या प्रकारचे शब्द वापरले आहेत, ते अशोभनीय आहेत, असे आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया म्हणाल्या होत्या.

Related Articles